मुलींशी बोलतांना लाजाळू मुलांनी फॉलो करा या टीप्स.
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या www.DreamMarathi.Com. वर जर का आपण मराठीतून motivational quotes marathi, motivational status in marathi, motivational thoughts in marathi, प्रेरणादायक विचार मराठीमध्ये संबंधाच्या शोधत , मुलींशी बोलतांना लाजाळू मुलांनी फॉलो करा या 4 टीप्स,असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमचे हे Motivational quotes आपल्याला आवडले असेल, जर "मुलींशी बोलतांना लाजाळू मुलांनी फॉलो करा या 4 टीप्स" आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग www.DreamMarathi.Com ला आवशय भेट दया.
१. मुलीकडे आत्मविश्वासाने पाहा.
आत्मविश्वास व्यक्तिमत्व खुलवतो. जो व्यक्ती आत्मविश्वासू असतो त्याच्याकडे कोणीही आकर्षिले जाते आणि मुख्य म्हणजे मुलींना आत्मविश्वास असणारी मुले जास्त आवडतात. जी मुलगी तुम्हाला आवडते तिच्याकडे तुम्ही आत्मविश्वासाने पाहायला हवे. तिच्यासोबत तुम्हाला बोलायचे असेल तर कोणताही संकोच न बाळगता, कोणतेही आढेवेढे न घेता बिनदिक्कतपणे बोला. तिच्यासोबत वेळ घालवा. चांगले कपडे घाला, व्यवस्थित तयार व्हा. यामुळे तुमची एक वेगळी छाप पडेल. ती तुम्हाला नोटीस करेल आणि तुमच्यामध्ये देखील आत्मविश्वास तयार होईल.
२. प्रेम व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धती तयार करा.
क्रशसमोर जाण्याची, तिला बोलायची, प्रपोज करण्याची भीती वाटत असेल तर चिठ्ठी लिहा. एका कागदावर तुमच्या मनातील सगळ्या भावना उतरवा. पत्र लिहा. कविता येत असतील तर कविता करून त्या लिहा आणि तिच्यापर्यंत पोहचवा. मुलींना असं स्वतःहून काहीतरी लिहिलेलं, व्यक्त झालेलं आवडतं. तसेच या खूप जुनाट पद्धती वाटत असतील तर मेसेजवरून पण तुम्ही विचारू शकता. तसेच समोरासमोर बोलायची लाज वाटत असेल तर फोन करून बोला. तुम्हाला जे माध्यम सोयीस्कर वाटते ते निवडा. पण व्यक्त होण्याला प्राधान्य द्या. व्यक्त होताना हातचे राखून बोलणे टाळा.
३. गाण्यांद्वारे तुमचे प्रेम आहे ते सांगा.
गाणी कोणी ऐकत नाही किंवा कोणाला आवडत नाही असे क्वचितच होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्रशला एखादं गाणं डेडीकेट करावं वाटत असेल तर तुम्ही करून पाहायला हवे. तुम्ही उत्तम गायक असाल तर सोने पे सुहागाच. एखादं तिला साजेसे असे गाणे तिच्यासमोर म्हणा आणि हे गाणं खास तुझ्यासाठी असं नमूद करायला विसरू नका. आजकाल तर सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून अशी गाणी बरीच व्हायरल होत असतात तर त्यांचा आधार घेऊन थेट मेसेज करून तुमच्या मनातलं सांगू शकता. गाणं मनाचा वेध घेणारं असतं. म्हणून तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी गाण्याहून उत्तम पर्याय कोणताच नाही.
४. व्हर्च्युअल पद्धतीने व्हा व्यक्त.
जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीसमोर उभे राहून बोलण्याची आपली हिंमतच होत नाही. ती व्यक्ती समोर दिसली की धडधड होते. बोबडी वळते. शब्दच फुटत नाहीत. अशी अवस्था तुमची होत असेल तर तुम्ही सरळ एक व्हीडिओ तयार करा. त्यात तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटते ते सगळं काही मांडा. तसेच व्हीडिओ कॉल किंवा व्हॉईस रेकॉर्ड करून सुद्धा पाठवू शकता. पण हे सगळं करताना आत्मविश्वासाने करा. चेहरा हसरा ठेवा. लाजू नका आणि बिनधास्त बोला.
या वरील टीप्स मी माझ्या स्वतःच्या बाबतीत वापरून पाहिल्या आहेत. ज्याचा मला खूप चांगला फायदा झाला आहे. यामुळे माझा लाजाळू स्वभाव बिनधास्त जे असेल ते बोलणाऱ्या मध्ये कधी बदलला ते माझे मला देखील कळले नाही. तेव्हा या टीप्स तुम्हीही वापरा. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुमची प्रेमाची गाडी सुसाट पळवा आणि हा लेख कसा वाटला तेही जरूर कळवा.

