सारखी चिडचिड होणे कसे टाळावे?
ज्या व्यक्तीच्या शारिरिक थकवा अथवा कामात चुका किंवा कोणतेच कामं मनासारखे होतं नसेल तर चिडचिड होते पण अशा वेळी शांत झोप घेणे पुरेसा आराम करणे व आपल्या मनातील ताण तणाव घरातील व्यक्ती अथवा जवळचा मित्र परिवार यांचेशी मन मोकळे बोलणे त्यामुळे मनावर येणारा ताण कमी होतो व चिडचिड पण थांबते,
माणूस आहोत सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतं नाही चुका ही होऊ शकतात , निर्णय ही चुकू शकतात, वेळ ही हातातून निसटू शकते सर्व दिवस सारखे नसतात हे लक्षात घेतले की माणूस सकारात्मक विचार करायला सुरुवात करतो व राग अथवा चीडचीड, अपराधी भावना येतं नाही, एक संधी हुकली तरी दुसरी असतेच हे लक्षात घेणे फार महत्वाचे.,
परिवारा एका व्यक्ती च्या चिडचिड करण्याने संपूर्ण कुटूंब तणावात रहाते व शांती नाहीसे होते व लहानमुले असतील तर त्यान्च्या बालमनावर हा पगडा बसतो म्हणजे एकंदरीत नुकसानच होते हा मुदा कर्त्या व्यक्तींनी ध्यानांत घ्यावाच.
