Type Here to Get Search Results !

15 August 2022 Status and Speech In Marathi | 15 ऑगस्ट 2022 Status आणि 15 ऑगस्ट भाषण मराठी

 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन !! 


15 ऑगस्ट मराठी भाषण (क्रं 1) :

सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले. मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. 

जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत दरिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाल-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले

 शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली. विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासागर, लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या, रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.



15 ऑगस्ट मराठी भाषण (क्रं 2) :

भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.

At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rearly in history, when we step out from old to the new.... India discovers herself again. Pandit Nehru.

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरूंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज अनेक वर्षांनंतरही स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वत: चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातयं.

भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे.. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि  यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण.

आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहिये. आपण आणखी काही वर्षांनी आपण स्वातंत्र्यपुर्तीची ७५ री धुमाधडाक्यात साजरी करु पण तेव्हा चित्र खरेच पालटले असेल अशी आशा व्यक्त करु या.

जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा

वो भारत देश है मेरा

या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल. !! स्वातंत्र्य दिन उत्सव !!



15 ऑगस्ट मराठी भाषण (क्रं 3) :

भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. I

१७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचेनेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात कॉंग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली कॉंग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटन च्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक शिख माणसांना त्यांचे घरदार,पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीर चा प्रश्न हि पुढे आला. 



स्वतंत्र भारत :

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकरह्यांचा मोलाचा वाट होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादहोते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.


भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्ली मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्यादिवशी बहुतांना रेडीओ चैनल तसेच दूरदर्शन वर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

15 ऑगस्ट मराठी सुविचार व स्टेटस Images :

सहिष्णुता आणि स्वातंत्र्यता एक महान राष्ट्राचा पाया आहे.


तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
.






स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान.





तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.


स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा.





अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे.





ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.






मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad