Type Here to Get Search Results !

ह्या' ६ टीप्स तुम्हांला संकटसमयी शांत ठेवतील | Life changing tips in marathi



जर आयुष्यात चांगली वेळ चालू असेल ,तर तिथे आपल्याला स्वतःला सावरावं लागत नाही. 

आपण आपोआपच आनंदामध्ये , आपल्या Happiness मध्ये वाहून जातो. पण जेव्हा एखादी संकटाची वेळ येते, दुःखाची वेळ येते तेव्हा मात्र स्वतःला शांत करणं , स्वतःला सावरन खूप कठीण जातं.

वाईट वेळ आणि परिस्थितीमुळे आलेली हतबलता कशी हाताळावी हेच कळत नाही , 

आणि मानसिक गुंतागुंत आणखीनच वाढत जाते. 

अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा हेच आपल्याला कळत नाही.

आपण त्या गोष्टीचां इतका विचार करतो ना की आपल्याला त्या situations मधुन बाहेर येणं देखील अवघड वाटू लागतं,

आणि अश्या विचारांमध्ये अश्या परिस्थितीत आपण वाईट मार्गावर जातो किंवा मानसिक आजार ही आपल्याला होऊन जातात..


तुम्हाला हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे की आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी आपण ठाम राहिले पाहिजे.


ही वेळ वाईट असू शकते पण येणारी वेळ कशी असेल हे ठरवणे नक्कीच तुमच्या हाती आहे.


वाईट दिवसांचा सामना कसा करायचा ?

कसे आपण विचारांनी भरलेल्या दिवसाला एक happy आणि तुमच्या Lucky day बनवू शकतो?


आणि तरीही मनात शंका येते की हे काम नक्कीच मला तोट्यात घेऊन जाणार आहे तर आपण ती situation कशी handdle करायची ,


म्हणजेच तुम्हाला संकटाच्या वेळी स्वतःला कसे सावरायचे, स्वतःला कसे शांत ठेवायचे ,

'ह्या' ६ टीप्स तुम्हांला संकटसमयी शांत रहायला मदत करतील म्हणून हा लेख पूर्ण अगदी शेटपर्यंत नक्की वाचा.





मित्रांनो संकटाच्या वेळ कसे आपण शांत राहिले पाहिजे ह्या वर बऱ्याच लोकांचे comments आलेत आणि finalliy हा व्हिडिओ खास तुमच्या साठी मी घेऊन आलो ह्या 6 टिप्स तुमचे future change करू शकतात म्हणून अगदी शेटपर्यंत वाचा.



१. अडचणींपेक्षा उपाय शोधण्यावर भर द्या.


एखादी अडचण आली तर ती अडचण माझ्यासमोरच का आली, माझाच काय दोष होता या सगळ्या नकारात्मक विचारांवर रडण्यापेक्षा उपाय शोधण्यावर आपण भर दिला पाहिजे. जितका लवकर उपाय आपण शोधू तितकं लवकर अडचणींमधून आपल्याला दूर होता येईल. 

उपाय शोधण्याची सवय आपल्याला आयुष्यभर मदतीची ठरु शकेल. अडचणींपुढे हार मानण्यापेक्षा,Give up करण्यापेक्षा,

 अडचणींवर मात करण्याची ताकद, आणि जिद्द तुम्हाला उपाय म्हणजेच मार्ग शोधण्याच्या सवयींमुळे आपल्याला मिळू शकेल.


२. कोणतीही परिस्थिती कायमस्वरुपी नाही हे लक्षात ठेवा.


कितीही वाईट परिस्थिती आली, कितीही मोठं संकट आलं तरी ते तात्पुरत्या काळासाठी आलं आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवावं. आपण आत्ता ज्या गोष्टीतून जात आहोत ती ठराविक काळानंतर संपणार आहे. आपलं आयुष्य पुन्हा पूर्ववत होणार आहे ही जाणीव आपण ठेवली तर वाईट परिस्थितीचे परिणाम होणार नाही. त्यामुळे अशा वाईट वेळेचा स्वीकार करुन आयुष्यात आलेल्या चांगल्या वेळेबद्दल कृतज्ञ राहणं अशा काळात महत्त्वाचं असतं.


कारण तुम्हाला हे समजन खूप महत्वाचं आहे की कोणतीच वेळ ही थांबत नाही कारण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येणार नाही .म्हणून कोणतीही परिस्थिती कायमस्वरुपी नाही हे लक्षात ठेवा.


३. अनपेक्षित बदल नवीन दृष्टीकोन देतात.

जेव्हा अचानक परिस्थिती बदलते, अचानक एखादं आव्हान आपल्यासमोर येतं तेव्हा आपल्यात नवीन दृष्टीकोन तयार होतो. अनपेक्षित बदलांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज होतो. कोणतीही तयारी नसताना अचानकपणे आपलं आयुष्य बदललं गेल्याने परिस्थितीचा स्वीकार करण्याचा मोठेपणाही आपल्यात येतो. हा बदल कधीकधी खूप अस्वस्थ करणारा असू शकतो. पण अशा कठीण प्रसंगांमधून आपला दृष्टीकोन व्यापक होत असतो आणि त्याचा आपल्यालाच फायदा होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

कारण बदल हाच ह्या सृष्टीचा नियम आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.

४. सकारात्मकतेचा सराव.

नेहमी Postive राहणे तुम्हाला संकटकाळात अधिक कणखर बनवेल.जेव्हा गोष्टी चांगल्या होत असतात तेव्हा आशावादी राहणं, सकारात्मक विचार करणं खूप सोपं असतं. पण सगळं मनाविरुद्ध होत असताना, काहीच चांगलं होत नसताना,

 मात्र सकारात्मक राहणं अतिशय कठीण असतं. पण तरीही जाणीवपूर्वक, लक्षात ठेवून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न आपण संकटाच्या काळात केला पाहिजे. अर्थात त्याचा सातत्याने सराव आपल्याला करावा लागतो. पण ही वेळ आयुष्यभरासाठी सकारात्मकतेची सवय आपल्याला लावते. संकटकाळाचा सामना करण्यासाठी अधिक कणखर बनवते.


५. स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी संधी म्हणून बघा.

संकटाच्या परिस्थितीबाबत तक्रारीच करायच्या झाल्या तर अनेक तक्रारी करता येतात. आपण नेहमीच कारणे देण्यात पटाईत असतो,पण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, पर्सनेलिटी devlopment च्या दृष्टीने, स्वतःमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने


 संकटाकडे पाहिलं तर अनेक संधी आपल्याला मिळू शकतात. नेहमीचा कम्फर्ट झोन दूर करुन स्वतःची ओळख आपल्याला संकटाच्या काळामध्ये होत असते.मि नेहमी mhnt अस्तो ना की तुम्ही तुमचा कंफर्ट zone आजच सोडा.

 अनेकदा परिस्थिती हाताळताना आपला कसही होऊ शकतो. ही सगळी आव्हानं पेलून धीट, निडर व्यक्तिमत्व म्हणून आपण स्वतःसमोर आणि समाजासमोर येऊ शकतो. पण यासाठी संकटाकडे संधी म्हणून पाहता आलं पाहिजे.


६. स्वतःला आणि इतरांना दोष देऊ नका.


एखादी नावडती परिस्थिती निर्माण झाली की आपण एकतर स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसतो. संकटातून मार्ग काढण्यापेक्षा परिस्थितीला दोष देण्यात वेळ घालवल्याने आपण आपली उर्जा नको तिथे खर्च करतो. शिवाय हा दोष देण्याचा स्वभाव आपण परिस्थिती हाताळण्यासाठी कसे कमकुवत आहोत हे दाखवून देतो.


 त्यामुळे संकटाची परिस्थिती आली तर त्यातून मार्ग काढावा.

 मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधावे. दोष देण्यात कधीही वेळ वाया घालवू नये.

I hope की तुम्हाला हे सहा मुद्दे आपल्याला संकटकाळाचा सामना कसा करायचा आणि या काळाचा शांतपणे स्वीकार कसा करायचा हे तुम्हाला समजले असेल. 

आपण सगळ्यांनीच हे मुद्दे आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे. 

संकटापुढे हार न मानता संकटाला आपल्यापुढे हार मानायला लावण्याचा दृष्टीकोन आपण ठेवला तर आयुष्य नक्कीच आनंदाने जगता येईल.

आणि अजून हि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला Insta वर follow करून विचारु शकतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad