Type Here to Get Search Results !

चुकां मधून शिका आणि मोठे व्हा नक्की वाचा | Learn From Your Mistakes In Marathi

आयुष्यात अशी एकही व्यक्ती नाही की जी चुका करत नाही , असा कोणीच नाही ज्याने आयुष्यात एकही चूक केली नाहीये. असे म्हणता ना की ,जर तुम्ही आयुष्यात काही चुकीचे केले नाहिये,तर तुम्ही आयुष्यात काहीही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाहीये. 

कोणतीही यशस्वी व्यक्ती ही सुरुवातीपासूनच , आधी पासूनच परिपूर्ण  म्हंजे Perfect नसते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने चूक केली आहे, त्यांना ही अपयश आलं आहेत आणि तरीही ते लोक आयुष्यात यशस्वी आहेत.कारण त्यांनी त्या त्यांच्या चुकांमधून शिकले आहेत.तुमचा प्रत्येक अयशस्वी प्रयत्न (Misteks) तुम्हाला आयुष्यात एक अनुभव देऊन जातो. आपली चूक झाली की आपल्याला वाईट वाटतं, पण प्रत्यक्षात आपण त्या चुकातून शिकतो, मग ती आपल्यासाठी एका गिफ्ट सारखी बनते.आज आपण आपल्या चुका तुम्ही कसे शिकायचे आणि अशा त्या चुका आयुष्यात होणार नाहीत हे जाणून घेणार आहोत म्हणून हा लेख  शेवटपर्यंत नक्की वाचा. 



How to Learn From Your Mistakes in Marathi


रिचर्ड ब्रॅन्सनने म्हटल्याप्रमाणे, " तुम्ही नेहमी नियमांचे पालन करून चालायला शिकत नाहीत. तुम्ही चालायला उभे राहता आणि  आणि तुम्ही पडता उठता चालायला शिकता. ,

"चुकीतुन शिकणे हा खूप मोठा अनुभव आहे" एकदा चूक केल्यास पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेता येते.तुमच्या विचारांनाही प्रोत्साहन मिळते.आणि विशेष म्हणजे,तुमची विचार करण्याची क्षमता देखील वाढते.ही चूक का झाली आणि आता का होणार नाही असा प्रश्न तुम्हाला पडतो .अमेरिकन तत्त्ववेत्ता 'जॉन ड्यूई' म्हणतात, ''अपयश हे बोधप्रद असते. जो माणूस खरोखर याचा विचार करतो, तो त्याच्या अपयशातून जितका शिकतो तितकाच त्याच्या यशातूनही शिकतो.एका छोट्याश्या गोष्टीने समजून घेऊयात आपण आपल्या चुकातून कसे शिकू शकतो, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या गुणातून आणि चुकातुन शिकून.

कसे आपण ही ह्या चुका आयुष्यात होणार नाहित आणि हे समजून घेऊ.एका व्यक्तीने आपल्या आयुष्यात खूप चुका केल्या , आणि त्याच्या चुकांमुळे तो खुपचं दुःखी ही होता आणि त्याला ह्या गोष्टीचा खूप Regreat होता की तो त्याच्या चुकांमुळे यश प्राप्त करू शकत नाहीये किंवा कधीच यशस्वी झाला नाही आणि ही गोष्ट खूप दुःखदायक आहे. तो मंदिरातून घराकडे जात असताना त्याला एक साधू भेटला. साधूने त्याच्या चेहऱ्यावरचा सगळं भाव पाहिला आणि त्याला थांबवताना तो साधू म्हणाला, "तुम्ही नाराज का आहात" त्या माणसाने साधू महाराजांना सर्व काही सांगितले.

साधू म्हणाले, "यावर एक उपाय आहे." तुमच्यापेक्षा जास्त चुका केलेल्या व्यक्तीला आणा किंवा अगदी निरुपयोगी एकाधी गोष्ट घेऊन या. हे ऐकून ती व्यक्ती काहीतरी बिनकामाचे म्हंजे निरुपयोगी गोष्ट शोधण्यास निघाला.काही अंतर चालून गेल्यावर त्याला एक कुत्रा दिसला, तो या कुत्र्याला घेऊन जाऊ लागला, पण त्या कुत्र्यात निष्ठेचा गुण होता. जसं आपण ही कुत्रा पाळला तर तो आपल्या मालकाच्या प्रति किती निष्ठावान असतो.म्हणून हा कुत्रा तर कामाचा आहे म्हणून  तो त्या कुत्र्याला सोडून  पुढे गेला.पुढे गेल्यावर त्याला काही काटेरी झुडपे दिसली. त्याला वाटले की ही काटेरी झुडपे  निरुपयोगी आहेत, ती लोकांना डंकते आणि ह्याचे शेतात काहीच काम नाही म्हंजे ही काटेरी झुडपे काहिच कामाची नाहीयेत ,पूढे गेल्यावर त्याला शेताला त्याच काटेरीझुडपाने कुंपण  लावलेलं दिसले. आणि मग त्याला विचार आला की ही झुडपे  पिकांचे जनावरांपासून संरक्षण करतात ही झुडपे सुध्धा कामाचे आहेत,असा विचार करून तो ती  तिथेच सोडून गेला.तो पुढे गेला पण त्याला असा एकही प्राणी किंवा वस्तू सापडली नाही जी काहीच कामाची नाही.हताश होऊन तो साधूकडे गेला.मग साधूनी त्याला सांगितले की प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही तरी चांगले दडलेले असते. फक्त आपली नजर योग्य असली पाहिजे , आणि जर आपण योग्य नजर ठेवून काम करू तर आपल्यालाही कोणातच अडथळा येणार नाही. म्हणून इतरांच्या गुणांमधून आणि आपल्या चुकांमधून आपण शिकायला हवं..


मित्रांनो जेव्हाही तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत असतात, आणि चुका करत असतात तेव्हा तुमच्याकडे फक्त दोनच  मार्ग असतात.एकतर हार मानणे , मागे हटणे म्हंजे माघार घेणे किंवा दुसरा तुमच्या चुकीपासून शिकणे, आपल्या अपयशातून शिकत रहायचे आणि आयुष्यात नेहमी पुढे  जातच रहायचे.लक्षात ठेवा चुका करणे चुकीचे नाही परंतु चुकून शिकणे आणि पुन्हा पुन्हा ती चूक करणे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे.लहानपणी, जेव्हा आपण शाळेत एखादी चूक करायचो तेव्हा आपल्याला, आपले teachers गालावर थाप मारायचे, किंवा छडी द्यायचे ,आणि ती चूक तुम्ही पुन्हा केली की दुसऱ्यांदा तुम्हाला एक नाही तर दोन चापट बसायचे.म्हणूनच आपण दोन वेळ मार खाल्ल्यामुळे ती चूक नाही करायचो.म्हणून आयुष्यातही आपण आपल्या चुकांमधून शिकल्याने आपल्यातील  उणिवांची जाणीव होते.म्हंजे आपल्यात काय कमी आहे किंवा आपण आजुन आहे काय केले पाहिजे की त्या चुका होणार नाहीत हे समजते.आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या उणिवा कळतात तेव्हा तुम्ही त्या दूरही करता.

माझा एक मित्र जॉब इंटरव्ह्यूसाठी गेला होता, आम्हा सर्वांना त्याची निवड होईल अशी आशा होती, पण त्याची निवड झाली नाही, सायंकाळी आम्ही एका ठिकाणी बसलो असताना त्याला विचारले की सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली होती ना.तेव्हा तो म्हणाला हो सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी नीटच दिलीत.त्याने सर्व उत्तरे चोखपणे दिली पण,बोलताना तो इकडे तिकडे डोळे फिरवत होता, म्हणजे नजरेला नजर देऊन बोलत नव्हता आणि म्हणतात ना "नजर हटी दुर्घटना घटी" त्याला त्याची चूक कळली आणि त्याने नेक्स्ट टाईम त्याची चूक सुधरवलीआणि तो चांगला जॉब साठी सिलेक्ट ही झाला.मित्रांनो या सगळ्या एक्झाम्पल देण्याचे कारण हेच की तुम्ही तुमच्या अपयशातून , चुकांतून शिकून आयुष्यात तुमच्या अपयशावर आणि संकटांवर मात कराल अशी आशा करतो.

आणि अजूनही तुमच्या काही प्रश्न असतील तर मला निसंकोचपणे विचारा खाली कमेंट करा किंवा इंस्टाग्राम वर फॉलो करून तुमचे प्रश्न विचारा आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीची आयुष्य बदलून टाकणारे लेख,कथा,सुविचार वाचा येथे दररोज नवं नवीन माहिती आणि खूप काही.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad