Type Here to Get Search Results !

Dream Quotes In Marathi | [100+] स्वप्नांवर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

 

मित्रानो, ह्या website वर तुम्हाला मराठी सुविचार , Inspairing Stories , कथा , LifeChanging Tips आणि खूप काही बघायला आणि शिकायला मिळेल त्या मुळे आम्हाला follow करायला विसरू नका. 

 प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खुप आधार देऊन जाते...!!!

कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य.

पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात.

जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.

संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही.

तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा.

माणसाजवळ त्याच्या आयुष्य भराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार हेच चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात.

दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातल देवपण हे संपल की माणूस संपला.

आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे.

मदत ही अशी बाब आहे , केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात.

स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.

संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.

अंदाज चुकिचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकिचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्य मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे.

प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीच प्रगती करत नाही.

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते. पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही, म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी थकून देऊ नका.

वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे.

शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील.

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका.

आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. कारण अहंकारापासून ते लांब असतं. "हम कुछ है" हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच .

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोड़ा पण जवळची माणसं तोडू नका, कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत.

मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना, घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल जीवनाचा.

प्रत्येकाचा "आदर" करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे, ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. # आपली माती आपली माणस.

"प्रतिष्ठित" व्यक्तिपेक्षा "चारित्र्यसंप्पन" व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण "चारित्र्य" हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते तर "प्रतिष्ठा" ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते.

कोणतीही गोष्ट न चिडता, न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खुप सोप्पं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड.

माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे, तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या,व सुखाने जगा.

आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात.

नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते.

माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहिजे लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात.

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

कोणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका कारण त्या शब्दापेक्षा त्याच्या भावना अनमोल असतात शब्द ठरवता येतात भावना ठरवून येत नाहीत.

कोणी कोणाला काही द्यावे ही , अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते.

नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची.

राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे असते त्याहून कितीतरी कठीण असते ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे आणि संयम ठेवणे ज्याला कळलं त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला.

परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात.

कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते, आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं.

आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथं पुन्हा "Once More" किंवा "Pause" Option नसतो.

डोळे आणि भावनिक स्पर्श..शब्दांपेक्षा छान बोलतात..अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत.

शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत.

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरवात करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad