Type Here to Get Search Results !

How To Stop Overthinking In Marathi | जास्त विचार करणाऱ्यांनी नक्की बघा.

मित्रानो आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण ताण- तणावमध्ये जगत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दुःख.!  जास्त विचार करणं, शिक्षण, नोकरी,लग्न, कामाचं प्रेशर, पगार, कौटुंबिक वाद, ब्रेकअप, प्रत्येकाला यातली काही ना काही समस्या आहेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येजण यावर विचार करत असतो. मित्रांनो माणूस हा विचारशील, आणि विकसनशील प्राणी आहे. पण आपण काय आणि कोणत्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. कारण याच्यावरच तर आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम अवलंबून असतात.




माणसाच्या जेव्हा अडचणी वाढत जातात ना तेव्हा तो जास्त विचार करायला लागतो. आणि अति विचार करणं हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे.

काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त विचार करण्याची सवय असते. उदाहरण द्यायचं झालं तर...समजा एक विद्यार्थी परिक्षेला बसलाय. त्याला सुरुवातीला 10 मार्क्स चे बहू पर्यायी (MCQ) प्रश्न आहेत. आणि त्याची वेळ फक्त 2 मिनिटे आहे. जर का तो पाहिल्याच प्रश्नाला 1 मिनिट वेळ घालवत असेल तर काय उपयोग ? बाकीच्या 1 मिनिटात तो 9 प्रश्न कसे सोडवणार? जर त्याला प्रश्न येत नसेल तर जास्त वेळ न घालवता A B C D या पैकी कोणत्याही पर्यायाला टिक करून पुढे जावे. आणि पुढचे प्रश्न सोडवावेत. कारण ते तरी बरोबर येतील. इथे वेळेचं अचूक नियोजन आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे.

मित्रानो विचार हे एखाद्या स्फोटकासारखे असतात. विचारांत स्फोटका इतकी ताकत असते. पण त्याचा अतिरेक  (जास्त विचार करणं) हा आपल्याला हानी पोहोचवल्या शिवाय राहत नाही.गरजेपेक्षा जास्त विचार करणं हे आरोग्यासाठी खूप घातक आहे. मग मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडेल की ,,, आपण विचारच करायचा नाही का ? तर नाही. असं बिलकुल नाही. आपण विचार नक्की करायला पाहिजे पण ते विचार सकारात्मक असायला पाहिजेत. आपल्याला नुकसान पोहोचवणारे किंवा आपल्या आरोग्याशी खेळणारे बिलकुल नसावेत.

Alway be positive thinking.

सतत च्या तुमच्या  जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे तुम्ही तुमची बाकीची कामं पण बिघडवू शकता.जास्त विचार केल्यानं एकटं एकटं वाटायला लागत. आपलं या जगात कोणीच नाही असा फील यायला लागतो. आपल्याला जगणं नकोसं व्हायला लागत. आपल्या डोक्यातील विचार आपल्यालाच खायला उठतात. आणि अति विचार केल्यानं माणसाचं वागणं देखील वेड्यासारख वाटायला लागतं.


जास्त विचार केल्यानं तुमच्यातली पॉझिटिव्ह energy ची जागा negative energey घेते आणि तुम्ही सतत negative विचार करायला लागता. मग आपले मित्र, नातलग देखील आपल्या पासून दूर व्हायला लागतात. स्वामींचं एक वाक्य आहे,

 तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार.


या प्रमाणे आपण स्वतः चं आपलं आयुष्य घडवूशकतो,आपल्या विचारांतून. जर का आपण positive विचार केला तरच.

  •  तोटे -
 मित्रांनो जास्त विचार केल्याने आपला स्वभाव पूर्वी सारखा राहत नाही. आपल्याला राग अनावर होतो. रागाच्या भरात माणूस काहीही करू शकतो. अति विचार केल्यानं झोप लागत नाही किंवा जास्त झोप येते, माणूस माणसावरचं विनाकारण संशय घ्यायला लागतो. आपण केलेल्या विचारांमध्ये गोंधळ निर्माण व्हायला लागतो, मग एखाद्या गोष्टीवर अपल्याला ठाम पणे निर्णय पण घेता येत नाही. डोक्यात विचारांचा गोंधळ निर्माण होतो.

  • उपाय - 

मग तुम्हाला तुमचे negative विचार टाळायचे असतील तर,तुम्ही मित्र मैत्रिणी, फॅमिली या ह्यांच्याशी बोला, संवाद साधा, तुम्हाला एकट- एकटं वाटणार नाही. पुस्तकं वाचा, movies पहा, स्वतः ला गुंतवून ठेवा. तुमचा प्रत्येक रिकाम टेकडा वेळ कोणत्या कोणत्या गोष्टी मध्ये इन्व्हेस्ट करा.  आणि सर्वात महत्वाच म्हणजे negative  लोकांपासून दूर राहा. आणि तरीही तुम्हाला कधी एकटं फील झालं , किंवा काही कारणास्तव दुःखी आहात तर तुम्हीं आपल्या ड्रीम मराठी या चॅनेल ला subscribe करून आपले motivational , inspirational, life changing videos देखील बघू शकता. तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही.

मित्रानो, ह्या website वर तुम्हाला मराठी सुविचार , Inspairing Stories , कथा , LifeChanging Tips आणि खूप काही बघायला आणि शिकायला मिळेल त्या मुळे आम्हाला follow करायला विसरू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad