आज मी फक्त 2 मिनिट बोलेल..कारण शब्द ही कमी पडतील ह्या गोड नात्यावर ज्याच नाव आहे "मैत्री"
आपण आपल्या जीवनात कितीतरी लोकांना रोज भेटत असतो पण त्यातले खूप कमी अशी लोक असतात ज्यांना आपलं नाव माहीत असतं त्यांना आपल्या स्वभाव माहिती असतो त्यांना आपले दुःख सुख सगळे माहिती असतातया नात्याचं नाव असते मैत्री..
आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असत.
मित्र म्हणजे एक झाड वळणावरती वाढणारं आपली सावली बनण्यासाठी.
मैत्री एक असं नातं जे आपल्या माईंड मध्ये आलं तर एक smile येते चेहऱ्यावर..
सैराट हा चित्रपट जवळ जवळ सर्वांनीच बघितलेला आहे... तो चित्रपट बघीतल्यावर मला नेहमी वाटतं आयुष्यात आर्ची सारखी गर्लफ्रेंड असो वा नसो माञ लंगड्या आणि सल्या सारखे मिञ सर्वांना मिळालें पाहिजे. कोणी तरी खरं म्हंटलं आहॆ..
मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ
करा..
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल
अशी करा..
बऱ्याच जणांना वाटते की मैत्री अशी असावी ती तशी असावी मला वाटते की मैत्रीची अशी काही व्याख्या नसते माझ्या हिशोबाने मैत्री अशी असावी??नदीत वाहणा-या पाण्यासारखी शुभ्र, निर्मळ, आणि पारदर्शक मैत्री असावी.कधी मित्रांची परिस्थिती न पाहता सुदामा नावाच्या भटजी सोबत असलेल्या कृष्णा सारखी जीवलग मैत्री असावी.कधी अडचणी च्या वेळी मित्रांची साथ न सोडणा-या कर्ण सारखी मैत्री असावी.कधी प्रेमामध्ये हरल्या नंतर घनदाट अंधारामध्ये हरवलेल्या मनाला देखील काजव्याच्या प्रकाशाने प्रसन्नित करणारी मैत्री असावी.
दुःखाच्या वाळवंटामध्ये देखील आनंदाचा पाझर आणणारी मैत्री असावी.मित्रांच्या मनातील रिक्त जागेमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी मैत्री असावी.सोबत असताना कधी कधी रडता रडता हसवणारी, तर कधी दूर गेल्यावर त्याच मित्र आणि मैत्रिणीच्या आठवणी मध्ये हसता हसता रडवणारी अशी घट्ट मैत्री असावी."**.चांगले मित्र आणि औषधे आपल्या जीवनातल्या वेदना कमी करत असतात फक्त फरक इतका असतो की औषधांची एक्सपायरी डेट असते पण मित्रांची नसते.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
या दूषित जगात गंगेच्या पाण्याइतकाच निर्मळ असणार्या, मित्रांमधील मरगळ दुर करणार्या, गरज पडली की मेणाहून मऊ अन् वज्राहून कठीण बनणार्या मित्राची, मैत्रीची नितांत गरज आहे.
जगाचा थोडा विचार न करता, आपल्या मित्राच्या सुख्-दु:खालाच जग मानून त्याच्यासाठीच झ्टणार्या, आपल्याजवळ असणांर ज्ञान, आपल्या मित्रांसाठी देऊन त्याला उभं करणार्या, आर्थिक मद्द्त करणार्या कल्पव्रक्षाप्रमाणं असणार्या माणसातच खरा मित्र वसतो असं मला वाटतं आणि माणुसकीने भरलेल्या माणसाशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही.आजच्या बेरोजगारीच्या युगात तर गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित 'सुदाम्या'ला मैत्रीखातर त्याच्याजवळ उंची पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका 'कट चहा' वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करणार्या सखा श्रीकृष्णाची!
जर विचार केला तर प्रेमाच्या नात्यात:
जर तुम्ही प्रेमात पडले आणि एखाद्याला म्हणाल की मी तुझ्यासोबत कुठल्याही प्रकारचे फिजिकल रेलेशनशिप ठेवणार नाही तर बघा ते प्रेम किती दिवस चालते.
म्हणजे या नात्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्वार्थ दडलेला असतोच ना?? मैत्रीत स्वतंत्र असतो यात कुठल्याही प्रकारच्या अटी नसतात कुठलीही बंधने नसतात..
मैत्री फक्त माणसशिच् करावी असं काही नसतं. मैत्री प्राण्यांसोबत पुस्तकां सोबत पक्षांसोबत मी तर म्हणतो वस्तू सोबत सुद्धा होत असते
मैत्रीचे नाते निस्वार्थ यात कुठल्याही प्रकारच्या अटी नसतात..मैत्रीच्या नात्यात कुठल्याही प्रकारचे बंधन नसते
पण मैत्री सुद्धा चांगल्या लोकांसोबतच करावे नाहीतर ही मैत्री केव्हा आपल्यासाठी घातक ठरेल हे सांगता येत नाही
आज जरी मैत्रीविषयी ऐकायला सगळं काही सुंदर वाटत असेल तरीही बऱ्याचदा काही जणांसोबत केलेली मैत्री ही एका poision पेक्षा कमी नसते..
अर्जुन आणि कर्ण हे दोघेही जगातले विख्यात धनुर्धर होते..त्याचप्रमाणे ते दोघे भाऊ देखील होते..
ज्याप्रमाणे अर्जुनाचा श्रीकृष्ण मित्र होते त्याचप्रमाणे करण्याचीदेखील दुर्योधन मैत्री होती.
अर्जुनाने श्रीकृष्णाची मैत्री करून त्याच्या कलांना चांगलीच दिशा दिली
परंतु याउलट कारणाने दुर्योधनाची मैत्री करून त्याच्या कलेचा पूर्णपणे नायनाट केला सत्यानाश
त्यामुळेच मैत्री देखील कधी आणि कोणासोबत करावी याचं ज्ञान माणसाला व्हायला हवं
चांगल्या लोकांशी केलेली मैत्रिणी मी आपल्यासाठी फ्रूटफुल ठरत असते.
चांगले मित्र आपल्या संकटातून बाहेर काढतात आणि वाईट मित्र आपल्याला नेहमी संकटात टाकत असतात.
मैत्री करा पण अशी करा ज्याने करून तुम्हाला नेहमी चांगले वाटेल कधीही पश्चाताप होणार नाही.
बघा मी फक्त 2 मिनिट बोलणार होतो ना केव्हा इतका वेळ गेला समजलच नाही.. खरचं मित्रीचे नाते हे खूप वेगळे असते ...
Love you all my friend's...

