कधी कधी ना आपण नवीन माणसांना भेटतो तेव्हा त्याचा स्वभाव नक्की कसा आहे, याचा अंदाज सर्वांनाच लावता येत नाही.
पहिल्या भेटीत बऱ्याचदा माणूस चांगला वाटतो पण नंतर तो वाईट ठरतो.कधी कधी तर वाईट वाटणाराच व्यक्ती नंतर चांगला वाटतो.
पण पहिल्याच भेटीत माणूस चांगला किंवा वाईट हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर चाणक्याने सांगितलेल्या 'समुद्रशक्तीचा' वापर आपण करायला हवा.
'समुद्रशक्तीचा' वापर करुन चाणक्यांनी राजकारणातील व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना आपली राजनीती ठरवता येऊ लागली व ते एक धुरंधर नेता वा विदवान झाले. आजच्या या विडियो मध्य याच समुद्रशक्तीचा वापर ते पण आजच्या काळानुसार कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि
ते तुम्ही समझून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
वीडियो छोटासा आहे पन लाइफ mdhi खूप उपयोगी tharu shkto , mhnun shevat पर्यंत नक्की बघा.
चला तर मग सुरू करूया..
१. नैसर्गिक व कृत्रिम पद्धत-
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा साधारण त्याची वागणूक कशी आहे, यावर लक्ष दिले तर आपल्याला तो माणूस नैसर्गिकरित्या वर्तन करत आहे की अनैसर्गिक वागत आहे हे कळू शकते. कारण आव आणून बोलणाऱ्या, हसणाऱ्या व्यक्ती या लगेच कळून येतात. तसेच जेव्हा त्या व्यक्तीला आपण त्याच्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्रासोबत भेटत असू तर त्याची त्यांच्यासोबत कशी वागणूक आहे, त्यांना ती व्यक्ती कसे वागवते यावरून आपल्याला कळू शकते की ती नक्की कशी आहे.
२. प्राण्यांसोबत वागण्याची पद्धत -
जर व्यक्तीला खरेच ओळखायचे असेल तर तो प्राण्यांसोबत कसा वागतो हे पाहावे. कारण मुक्या जनावरांना सुद्धा माणसांइतकीच किंमत असते हे जो माणूस उत्तमरित्या ओळखतो तो माणूस नक्कीच मनाने चांगला असतो. तुम्ही दोघे बोलत असाल आणि समोरच असलेल्या कुत्र्याला लागले व त्याच्या आवाजाने ती व्यक्ती काय झाले म्हणून पहायला उठली तर समजावे की, याला इतरांबद्दल प्रचंड आस्था आहे.
मित्रानो पुढच्या point जाणून घेण्या आधी , जर चॅनल वर नवीन असाल तर subs करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण sub नाही करत का नाही कर sub करा म्हंजे नवीन व्हिडिओ ..
३. इतरांसमोर वागण्याची पद्धत -
जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजेच हॉटेल, कॅफे अशा ठिकाणी भेटलात तर तिथल्या कामगारांशी, वेटर्स लोकांशी त्यांचे कसे बोलणे आहे, त्यांना ते कसे वागवतात यावरून तो माणूस म्हणून कसा आहे, इतर लोकांबद्दल त्याच्या काय भावना आहे, इतरांना तो किंमत देतो आहे की नाही हे कळू शकते.
४. तात्काळ प्रतिक्रिया काय असते -
भेट झाल्यावर कोणत्याही विषयावर तो व्यक्ती कसा विचार करतो, त्याचे मत काय ?
यावरून देखील त्याची मानसिकता पडताळून पाहिली जाऊ शकते.
एखादी समस्या आली किंवा अपेक्षित नसलेल्या गोष्टी घडल्या, बोलल्या गेल्या तर त्यावर तो व्यक्ती कशी प्रतिक्रिया देतो हे पाहावे. जर शांत राहून समस्या हाताळण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीकडून होत असेल तर निश्चितच त्या व्यक्तीचा स्वभाव समजूतदार आहे असा त्याचा अर्थ होईल. याउलट जर लगेच भडकणे, वाद घालणे यांसारख्या गोष्टी घडल्या तर माणूस चिडखोर आहे असे समजावे.
५.ऑनलाईन भेटताना -
आजकाल सोशल मीडियामुळे व्यक्तीपर्यंत पोहचणे सहजशक्य झाले आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला आपण भेटलो आहोत त्याची सोशल मीडियावर जाऊन शहानिशा करू शकतो. त्याचे मित्र कोण आहेत, कसे आहेत यावरून एक प्रकारचा अंदाज येतो. शिवाय त्याचे प्रोफाइल, फोटो यांची पार्श्वभूमी काय आहे हे पाहून व्यक्ती कसा आहे हे जाणता येते.
६. अंतर्मनाचे ऐका -
आपले अंतर्मन नेहमी जागृत असते. ते नेहमी प्रत्येक गोष्टीबाबत आपल्याला सूचना देत असते. एखादी व्यक्ती जर खोटे वागत असेल, बोलत असेल तर आपले मन सांगत असते. त्यावेळी आपल्या मनाचा आवाज ऐकून त्यावर विश्वास ठेवणे उचित असते. माणूस खरा असेल तर त्याच्या वावरातून, बोलण्यातूनसुद्धा ते लगेच जाणवते. त्यामुळे जर आपल्याला आतूनच त्याबद्दल चांगले वाटत असेल तर आणि नसेल वाटत चांगले तर तो वाईट आहे अशी खात्री करून घेणे फायद्याचे ठरते.
या वरील गोष्टींचा ढोबळमानाने विचार केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण साधारणपणे या बाबी खूप सामान्य असतात. जिथे तो व्यक्ती कसा वागला, बोलला यावरून त्याची पारख करा. जेणेकरून पुढे तुम्हाला त्याच्याशी संबंध ठेवणे, नातं निर्माण करणे सोपे आणि सुखकर होईल. मग आजपासूनच तुमची नजर, कान, डोके हे सगळंच चौकस ठेवा आणि आयुष्यात चांगली माणसे कमवा.
मित्रानो ,
जेव्हा आपली व्यक्ति म्हणजे आपल्या जवळची व्यक्ति आपल्याला सोडून जाते ह्म्म आपल हृदय तोडून जाते, आपल्या मनातल्या भावनांशी खेळून जाते तेव्हा ना समजून घ्या..
Hmmm
समजून घ्या की ती व्यक्ती जी आपली होती
ती सोडून गेली मग ती आपली कसी झाली.. आणि जर ती आपली होती मग ती का सोडून गेली.. त्या व्यक्तीने नसेल तुम्हाला आपल मानाल..
नक्किच ...
नक्कीच तुम्ही तिला आपल मानल असेल..
आता ती सोडून तुम्हाला सोडून गेलीय... आणि तिचा खरा खरा चेहरा तुम्हाला दाखवून गेलीय, आणि जे आज झालय ते चांगलच झालय कारण जी आज सोडून गेली ,
ती गेलीच असती,
जे आपले नाहीत ते कधीच आपले होणार नाहीत ,
मग आता उठा आणि move on करा.. कस असत काहि गोष्टी आपन ही सोडून दिलेल्या बर्या असतात..
आयुष्यात चांगल्या लोकांना कमवा..
मग बघा आयुष किती सुंदर होत.
आणि अजून हि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही direct मला insta var follow करून विचारू शकतात लिंक in description..
I hope ह्या व्हिडिओ मधून थोडी ही help झाली असेल तर लाईक करून शेअर करा.


EK NUMBER MAHITI DILI SIR......
उत्तर द्याहटवा